
Tata Trusts Power Struggle
Sakal
Tata Trusts Power Struggle: भारतातील सर्वात प्रतिष्ठित व्यावसायिक घराणं असलेल्या टाटा ग्रुपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला आहे. 157 वर्षांच्या इतिहासात कधी न घडलेलं दृश्य आज दिसत आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की भारत सरकारलाच मध्यस्थी करण्यासाठी पुढे यावं लागलं. दोन केंद्रीय मंत्री लवकरच टाटा ग्रुपच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत, जेणेकरून मुख्य मालकी हक्क असलेल्या टाटा ट्रस्ट्समधील कलह शांत करता येईल.