Tata Group: टाटा समूह खरेदी करणार देशातील सर्वात मोठा कपड्यांचा ब्रँड? इतक्या कोटींना होणार डील

Tata Group: टाटा समूह लोकप्रिय कपड्यांचा ब्रँड फॅब इंडिया खरेदीसाठी चर्चा करत आहे. 2020-21 मध्ये फॅबिंडियाच्या महसुलात 30 टक्क्यांनी घसरण झाली होती आणि तो 1059 कोटी रुपयांवर आला. मार्च 2021च्या आर्थिक वर्षात Fabindia ला 116 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.
Tatas in talks to buy stake in Fabindia’s apparel line
Tata GroupSakal
Updated on

Tata Group: टाटा समूह लोकप्रिय कपड्यांचा ब्रँड फॅब इंडिया खरेदीसाठी चर्चा करत आहे. 2020-21 मध्ये फॅबिंडियाच्या महसुलात 30 टक्क्यांनी घसरण झाली होती. मार्च 2021च्या आर्थिक वर्षात Fabindia ला 116 कोटी रुपयांचा तोटा झाला. कंपनीच्या 60 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कंपनीला तोटा सहन करावा लागला.

कंपनीला निधीची आवश्यकता

ग्रामीण भागातून उत्पादने मिळवून शहरांमध्ये ग्राहकांना विकणाऱ्या कंपनीच्या विक्रीत गेल्या दोन दशकांत पहिल्यांदाच घसरण झाली. गेल्या तीन वर्षात कंपनीला मोठे नुकसान झाले आहे. फॅब इंडियाला कर्ज भरण्यासाठीच नाही तर त्यांच्या स्टोअर्सची क्षमता वाढवण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. असे वृत्त बिजनेस लाइनने दिले आहे.

टाटा समूह आणि फॅब इंडिया यांनी खरेदीबाबात कोणतेही वक्तव्य केले नाही. टाटा समूह ही कंपनी 400 कोटींपेक्षा कमी किंमतीत खरेदी करु शकते अशी शक्यता आहे. फॅब इंडियाच्या प्रवक्त्याने याबाबत कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे सांगितले आहे.

फॅब इंडियाने IPO मागे घेतला

फॅब इंडियाने गेल्या वर्षी IPO 4000 कोटी उभारण्याचा निर्णय घेतला होता. ज्यामध्ये 500 कोटी रुपये ताज्या इश्यूद्वारे विकले जाणार होते आणि IPO मधील विद्यमान भागधारकांना 25.1 दशलक्ष शेअर्स विकले जाणार होते.

Tatas in talks to buy stake in Fabindia’s apparel line
Google Layoffs: गुगलने पुन्हा केली कर्मचारी कपात; भारतातील कामावर होणार मोठा परिणाम

कंपनीने जानेवारी 2022 मध्ये शेअर बाजार नियामक SEBI कडे IPO लाँच करण्याच्या मंजुरीसाठी मसुदा कागदपत्रे दाखल केली होती, ज्याला एप्रिल 2022 मध्ये SEBI ने देखील मान्यता दिली होती. पण कंपनीने शेअर बाजारातील घसरण आणि बाजारात सध्या सुरू असलेल्या गोंधळाचे कारण देत IPO मागे घेतला होता.

फॅब इंडियाची अशी झाली सुरुवात

फॅब इंडियाची सुरुवात जॉन बिसेल यांनी 1960 मध्ये केली होती. भारतीय पारंपारिक पोशाखांमध्ये कंपनीने स्वतःसाठी एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

खरं तर, 1958 मध्ये अमेरिकन जॉन बिसेल यांनी हातमागाच्या कपड्यांची बाजारपेठ म्हणून अखिल भारतीय हस्तशिल्प मंडळ आणि कुटीर उद्योग स्थापन करण्याच्या उद्देशाने भारताला भेट दिली आणि ते येथेच राहिले.

Tatas in talks to buy stake in Fabindia’s apparel line
Lok Sabha Election: व्यापाऱ्यांमध्ये चिंता! निवडणूक प्रचार साहित्याच्या मागणीत मोठी घट; लाखोंचा माल पडून, काय आहे कारण?

या कंपनीची सुरुवात एका दुकानापासून झाली. फॅब इंडियाने 1976 मध्ये दिल्लीत आपले पहिले रिटेल स्टोअर स्थापन केले. कंपनीचे देश-विदेशातही स्टोअर्स आहेत.

कंपनीचे संस्थापक जॉन बिसेल यांचा मुलगा विल्यम बिसेल सध्या कंपनी चालवत आहे. 1988 मध्ये ते वडिलांच्या व्यवसायात रुजू झाले. त्याच्या सुरुवातीच्या काळात, विल्यमने कारागीर सहकारी 'भद्राजुन कारीगर ट्रस्ट' (BAT) ची स्थापना केली, जी राजस्थानमधील विणकरांसोबत काम करत होती. कंपनी आज जागतिक दर्जाची उत्पादने तयार करण्यासाठी देशभरातील 55,000 कारागिरांसोबत काम करते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.