
Tej Pratap Yadav Net Worth: लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेज प्रताप यादव सध्या चर्चेत आहे. त्याने त्याच्या फेसबुक अकाउंटवरून अनुष्का यादवसोबतच्या त्याच्या नात्याचा खुलासा करणारी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आणि राजदमध्ये भूकंप झाला. लालू यादव यांनी तेज प्रताप याच्यावर तात्काळ कठोर कारवाई केली आणि त्याला पक्षातूनच नव्हे तर घरातूनही बाहेरचा रस्ता दाखवला.