
Tilak Verma Net Worth
Sakal
Tilak Verma Net Worth: आशिया कप 2025च्या थरारक अंतिम सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा 5 विकेट्सने पराभव करत इतिहास रचला. या विजयामागचा खरा हिरो ठरला मिडल ऑर्डरचा दमदार फलंदाज तिलक वर्मा. तिलक वर्माने फक्त काही वर्षांतच भारतीय क्रिकेट संघात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. या प्रवासात त्याच्या संपत्तीतही वाढ होत गेली. क्रिकेटमधून होणारी कमाई, BCCI कडून मिळणारे कॉन्ट्रॅक्ट आणि ब्रँड एंडोर्समेंट्स यांच्या जोरावर त्याने प्रचंड संपत्ती कमावली आहे.