
पर्नो रिका कंपनी भारतातील लोकप्रिय व्हिस्की ब्रँड इम्पीरियल ब्लू विकण्याच्या तयारीत आहे.
तिलकनगर इंडस्ट्रीजच्या बोर्डाची आज महत्त्वाची बैठक होणार असून निधी उभारणीवर चर्चा केली जाईल.
कंपनीच्या शेअरमध्ये 5 दिवसांत तब्बल 28% वाढ झाली आहे.
Imperial Blue Deal: भारताच्या मद्य बाजारात मोठी डील होण्याची शक्यता आहे. फ्रन्सची नामांकित मद्यनिर्मिती कंपनी पर्नो रिका (Pernod Ricard) भारतातील लोकप्रिय व्हिस्की ब्रँड इम्पीरियल ब्लू विकण्याच्या तयारीत आहे. हा ब्रँड खरेदी करण्यासाठी तिलकनगर इंडस्ट्रीज आघाडीवर असून कराराची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. अशी माहिती इकॉनॉमिक टाईम्सने दिली आहे.