
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन तेल खरेदी थांबवल्याशिवाय भारतासोबत व्यापार करार करण्यास नकार दिला.
अमेरिकेने भारतातून येणाऱ्या वस्तूंवर टॅरिफ 25% वरून 50% पर्यंत वाढवले.
पंतप्रधान मोदी यांनी ठाम भूमिका घेत बाह्य दबावासमोर झुकणार नसल्याचा संदेश दिला.
Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोबत व्यापार करार (Trade Deal) करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, रशियाकडून तेल खरेदीचा मुद्दा सुटल्याशिवाय ट्रेड डीलवर कोणतीही चर्चा होणार नाही. असे त्यांनी व्हाईट हाऊसमधील ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांना सांगितले.