
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून येणाऱ्या मालावर 25% अतिरिक्त टॅरिफ लावला.
भारतीय उद्योगपती हर्ष गोयनका व आनंद महिंद्रा यांनी या निर्णयावर संताप व्यक्त करत भारताच्या आत्मनिर्भरतेचा पुन्हा उल्लेख केला.
महिंद्रांनी सरकारला 'Ease of Doing Business' आणि पर्यटन क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला.
Trump Tariff Effects: 6 ऑगस्ट रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविरोधात एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या निर्यातीवर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. यामुळे भारतावरील एकूण टॅरिफ आता 50 टक्क्यांवर पोहोचला आहे. या निर्णयामुळे भारतीय उद्योजक संतापले आहेत.