
अमेरिकेने बहुतेक आयातीत वस्तूंवर सरासरी 20% टॅरिफ लावले आहे. यामुळे तिथली महागाई (CPI) तातडीने 2.4% पर्यंत वाढू शकते.
भारताची सुमारे 22% निर्यात अमेरिकन बाजारावर अवलंबून आहे.
नवे टॅरिफ लागू झाल्याने फार्मा, इलेक्ट्रॉनिक्स, सोलर, जेम्स-ज्वेलरी आणि मशीनरी या प्रमुख निर्यात क्षेत्रांना मोठा फटका बसू शकतो.
Trump Tariff Impact: अमेरिकेत महागाई वाढण्याची शक्यता आहे. यामागचं मुख्य कारण म्हणजे नवीन आयात कर (टॅरिफ) लागू करणं. एसबीआयच्या एका अहवालानुसार, अमेरिका आता आपल्या बहुतेक आयातींवर सरासरी 20% कर आकारतेय. याचा थेट परिणाम अमेरिकेतील महागाईवर आणि भारतासारख्या देशांच्या व्यापारावर होणार आहे.