
Global Recession Trump Policies: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'रेसिप्रोकल टॅरिफ' जाहीर केले असून, यामुळे जागतिक व्यापार युद्धाची भीती निर्माण झाली आहे. अर्थतज्ज्ञ स्वामिनाथन अय्यर यांनी या दिवसाला 'मंदीचा दिवस' असे म्हटले आहे.
ट्रम्प यांनी याला 'मुक्तीचा दिवस' म्हटले असले तरी, अय्यर यांच्या मते, हे टॅरिफ पुरवठा साखळीला खंडित करेल, आर्थिक वाढीला धक्का देईल आणि जागतिक अर्थव्यवस्थेला अस्थिरतेत ढकलतील. “ट्रम्प यांनी याला मुक्तीचा दिवस म्हटले. मला वाटते, याला मंदीचा दिवस म्हणायला हवे,” असे अय्यर यांनी सांगितले.