
अमेरिकेत ट्रम्पयांच्या टॅरिफ धोरणामुळे मोठ्या कंपन्या दिवाळखोर होत आहेत.
2025 मध्ये आतापर्यंत 446 कंपन्या दिवाळखोर झाल्या असून हा आकडा कोरोना काळापेक्षा 12% जास्त आहे.
बेरोजगारी आणि महागाई वाढल्याने अर्थव्यवस्था गंभीर संकटात आहे
Trump Tariff Impact: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देशाला कर्जाच्या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी आक्रमक पावले उचलत आहेत. परदेशी वस्तूंवर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावून त्यांनी ‘टॅरिफ वॉर’ सुरु केले आहे. पण याचा उलट परिणाम समोर येत असून, या वर्षी अमेरिकेत आतापर्यंत तब्बल 446 मोठ्या कंपन्या दिवाळखोर झाल्या आहेत. हा आकडा कोरोना काळातील (2020) आकड्यापेक्षा 12 टक्के जास्त आहे. फक्त जुलै महिन्यातच 71 कंपन्या दिवाळखोर झाल्या असून, हे प्रमाण गेल्या पाच वर्षांतील सर्वात जास्त आहे.