UNDP : कोरोनाकाळानंतर गरीब देश आणखी हलाखीत; विकास असमान पद्धतीने होत असल्याचे ‘यूएनडीपी’चे निरीक्षण

कोरोना महासाथीच्या धक्क्यातून अनेक देश बाहेर पडून पुन्हा एकदा वेगाने विकास करत असले तरी गरीब देशांची परिस्थिती मात्र अद्यापही बिकट असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या विकास कार्यक्रमाने (यूएनडीपी) निदर्शनास आणून दिले आहे.
UNDP COVID-19 has exacerbated poverty in developing countries and development is happening in an uneven manner
UNDP COVID-19 has exacerbated poverty in developing countries and development is happening in an uneven mannerSakal

न्यूयॉर्क : कोरोना महासाथीच्या धक्क्यातून अनेक देश बाहेर पडून पुन्हा एकदा वेगाने विकास करत असले तरी गरीब देशांची परिस्थिती मात्र अद्यापही बिकट असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या विकास कार्यक्रमाने (यूएनडीपी) निदर्शनास आणून दिले आहे.

दोन दशकांनंतर गरीब आणि श्रीमंत देशांमधील आर्थिक दरी कमी होत असतानाच कोरोना काळात बसलेल्या धक्क्यामुळे ही दरी पुन्हा रुंदावत आहे, असे ‘यूएनडीपी’चे अध्यक्ष अशिम स्टायनर यांनी सांगितले.

जगभरातील अनेक देशांमध्ये १९९० च्या तुलनेत विकासाचा वेग वाढला आहे. २०२० आणि २०२१ मध्ये कोरोना काळामुळे झालेल्या घसरणीवर मात करूनही अनेक देश विकासाची नवी उंची गाठत आहेत.

मात्र, जगातील सुमारे निम्म्या गरीब देशांमध्ये विकासाचा गाडा रुतला असून त्यांची स्थिती २०१९ पेक्षाही खराब झाली असल्याचे ‘यूएनडीपी’ने म्हटले आहे. ‘‘या जगाची विभागणी श्रीमंत आणि गरीब अशा दोन भागांमध्ये झाली असून असमान पद्धतीने विकास होत आहे.

मात्र, यामुळे संघर्षाची स्थिती निर्माण होत असून गरीब जनतेचे हाल होत आहेत,’’ असे स्टायनर यांनी सांगितले. विकासाचा वेग असमानता असल्याने संपत्तीही निवडक ठिकाणीच जाते, असे निरीक्षण स्टायनर यांनी अहवालात म्हटले आहे.

जगासमोर पर्यावरण बदल, संसर्गाची संभाव्य साथ, डिजिटल अर्थव्यवस्था आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर यांचे आव्हान असताना आणि त्यांचा सामना करण्यासाठी एकत्र येण्याची गरज असताना, ते सोडून ध्रुवीकरण मात्र वाढत आहे, अशी खंत स्टायनर यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com