Rajeev Chandrasekhar : विकासाच्या दृष्टीने पुढचे दशक भारताचे ; चंद्रशेखर

विकासाच्या दृष्टीने पुढचे दशक हे भारताचेच राहणार आहे, असा विश्वास केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी व्यक्त केला. ‘विकसित भारत संकल्प यात्रे’अंतर्गत ‘आय एम विकसित भारत ॲम्बेसिडर कार्यक्रमात ते बोलत होते.
Rajeev Chandrasekhar
Rajeev Chandrasekharsakal

पुणे : विकासाच्या दृष्टीने पुढचे दशक हे भारताचेच राहणार आहे, असा विश्वास केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी व्यक्त केला. ‘विकसित भारत संकल्प यात्रे’अंतर्गत ‘आय एम विकसित भारत ॲम्बेसिडर कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी पुण्यातील तरुण उद्योजक, स्टार्टअप्स, विद्यार्थी तसेच नागरिकांशी संवाद साधला.

Rajeev Chandrasekhar
WTO Ministerial Conference : ‘डब्लूटीओ’च्या अस्तित्वाचा प्रश्‍न उपस्थित

‘विकसित भारत संकल्प यात्रा’ या विषयावर सादरीकरण आणि विश्लेषण करताना केंद्रीय मंत्री चंद्रशेखर म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ या संकल्पनेला पुढे नेण्यासाठी देशातील प्रत्येक घटकाचे त्यामध्ये योगदान आवश्यक आहे.’’ पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने भारत वाटचाल करत आहे. त्यामुळे तरुणांसाठी जागतिक संधी उपलब्ध होत आहेत. ‘विकास भी विरासत भी’ या संकल्पनेनुसार आपली ओळख, आणि अभिमान जपून विकास साधला जात असल्याचेही चंद्रशेखर म्हणाले.

पुण्यात अकराशे कोटींची गुंतवणूक

सेमी कंडक्टर उपकरणासाठी केंद्र सरकारने नवे धोरण तयार केले आहे. त्यामुळे पुढील दोन वर्षांत तब्बल अडीच लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. त्यातील अकराशे कोटी रुपयांची गुंतवणूक पुणे परिसरात होईल, असा विश्वास राजीव चंद्रशेखर यांनी व्यक्त केला. कोरोना काळात भारत सेमिकंडक्टर उपकरणांसाठी चीनवर अवलंबून होता. आता पुढील काळात भारत हा सेमीकंडक्टरचा देश म्हणून ओळखला जाईल, असेही ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com