UPSC EPFO Recruitment 2026
esakal
युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच UPI आता रोजच्या व्यवहाराचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. चहाच्या टपरीपासून मोठ्या दुकानांपर्यंत आणि ऑनलाइन खरेदीपासून बिल भरण्यापर्यंत जवळपास सगळीकडेच आपण UPIचा वापर करतो. काही दिवसांपूर्वी याच UPI व्यवहारांवर शुल्क आकारलं जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, सरकारकडून अशा बातम्या निराधार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यानंतर आता नीति आयोगाचे उपाध्यक्ष अशोक लहिरी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा UPI शुल्काचा मुद्दा चर्चेत आला आहे.