

UPI व्यवहारांवरील मर्चंट डिस्काउंट रेट (MDR) लागू करण्याच्या चर्चेदरम्यान डिजिटल पेमेंटच्या वापराबाबत एक सर्वेक्षण समोर आले आहे. ‘लोकलसर्कल्स’ने केलेल्या या सर्वेक्षणानुसार, दुकानदारांनी UPI पेमेंटसाठी ग्राहकांकडून अतिरिक्त शुल्क आकारल्यास अनेक ग्राहक इतर पेमेंट पर्यायांकडे वळण्याची शक्यता आहे. विशेषतः २,००० रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या व्यवहारांमध्ये UPI वापरावर परिणाम होऊ शकतो, असे सर्वेक्षणातील प्रतिसादांवरून दिसून येते.