Banking Crisis: आर्थिक मंदीबाबत जेपी मॉर्गनच्या सीईओंचे सूचक वक्तव्य; म्हणाले 2008च्या जागतिक...

अलीकडेच दोन बँका कोसळल्यानंतर अमेरिकेच्या आर्थिक क्षेत्रात उलथापालथ झाली आहे.
Banking Crisis
Banking Crisis

Banking Crisis: अमेरिकेतील अलीकडच्या बँकिंग संकटाची सुरुवात सिलिकॉन व्हॅली बँक (SVB) कोसळून झाली. अलीकडेच दोन बँका कोसळल्यानंतर अमेरिकेच्या आर्थिक क्षेत्रात उलथापालथ झाली आहे.

अमेरिकन वित्तीय सेवा कंपनी जेपी मॉर्गन चेसचे सीईओ जेमी डिमन म्हणले की हे बँकिंग संकट अद्याप संपलेले नाही आणि ते संपवण्यासाठी बँक नियामकांना या संकटाकडे नवीन दृष्टीकोनातून पाहायला हवे. (US banking crisis not over JPMorgan CEO on possibility of 2008 like recession)

"सध्याचे संकट संपलेले नाही. जरी असे झाले तरी, आम्ही त्याचे परिणाम येत्या काही वर्षांत पाहणार आहोत," असे सीईओने भागधारकांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. "सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अलीकडील घटना 2008 च्या जागतिक आर्थिक संकटा सारखी नाही," असेही ते म्हणाले.

अमेरिकेतील अलीकडच्या बँकिंग संकटाची सुरुवात सिलिकॉन व्हॅली बँक (SVB) कोसळून झाली. बँकेची स्थिती बिकट झाल्याने ठेवीदारांनी अचानक अब्जावधी डॉलर्स बँकेतून काढून घेतले.

त्यानंतर यूएस प्राधिकरणाने 10 मार्च रोजी बँक बंद करण्याचे आदेश दिले. दोन दिवसांनंतर सिग्नेचर बँकही अशाच पद्धतीने बंद पडली.

लवकरच हे संकट युरोपात पोहोचले आणि स्वित्झर्लंडची आघाडीची बँक क्रेडिट सुईसही कोसळण्याच्या मार्गावर होती. नंतर, स्विस प्राधिकरणाच्या हस्तक्षेपाने, यूबीएसने बँक ताब्यात घेण्याचे मान्य केले.

बँकिंग परिस्थिती सुधारली नाही तर सिलिकॉन व्हॅली बँक आणि सिग्नेचर बँक सारख्या संकटात अमेरिकेतील सुमारे 110 बँका अडकू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे. बँकिंग संकट सोडवण्यासाठी अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने बँकांना 250 अब्ज डॉलरची आर्थिक मदत दिली आहे.

Banking Crisis
Gold Silver Price : सोन्याच्या दराचा ऐतिहासिक विक्रम; चांदीच्या दरातही मोठी वाढ, जाणून घ्या आजचा दर

स्वित्झर्लंडची सर्वात मोठी बँक UBS आणि Credit Suisse यांचे विलीन होणार आहेत. दरम्यान, या विलीनीकरणामुळे जगभरातील 36,000 कर्मचाऱ्यांना नोकऱ्या गमवाव्या लागणार असल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे.

अहवालानुसार, कंपनी 20 ते 30 टक्के कर्मचार्‍यांना कामावरून काढू शकते. याचा अर्थ 25,000 ते 36,000 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. यावरून हे संकट किती मोठे आहे याचा अंदाज येतो.

Banking Crisis
सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com