
What is Reciprocal Tariff: डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून दुसरी इनिंग सुरू केली तेव्हाच त्यांनी सांगितलं होतं की आम्ही 'रेसिप्रोकल टॅरिफ'चा निर्णय घेणार. आज त्यांनी 'रेसिप्रोकल टॅरिफ'चा निर्णय घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 एप्रिल 2025 हा दिवस 'अमेरिकन व्यापार मुक्ति दिन' म्हणून घोषित केला आहे.
या घोषणेनंतर भारतासह अनेक देशांना धक्का बसला आहे. ट्रम्प यांनी या धोरणाचे वर्णन 'अमेरिका फर्स्ट' मोहिमेतील महत्त्वाचा भाग असल्याचे सांगितले. अमेरिका आता भारतावर 26 टक्के शुल्क लावणार आहे. त्याचा काय परिणाम होईल हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.