
PF Account: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था (EPFO) ही भारतात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी काम करते. यामध्ये कर्मचारी आणि कंपनी अशा दोघांचेही दरमहा योगदान असते. हे पैसे कर्मचारी निवृत्तीनंतर काढू शकतात. मात्र, काही विशिष्ट परिस्थितींमध्ये निवृत्तीपूर्वीच काही रक्कम काढण्याची परवानगी असते. त्यापैकी एक महत्त्वाची अट म्हणजे बेरोजगारी.