Forbes Billionaires: तब्बल 99 व्या वर्षी अब्जाधीशांच्या यादीत मिळवले स्थान; जाणून घ्या काय आहे व्यवसाय

फोर्ब्सनुसार, मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत अब्जाधीश आहेत.
Forbes Billionaires
Forbes BillionairesSakal
Updated on

Forbes Billionaires List 2023: अब्जाधीशांच्या संपत्तीचा अंदाज घेणाऱ्या फोर्ब्स मासिकाची 2023 ची यादी जाहीर झाली आहे. फोर्ब्सनुसार, मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत अब्जाधीश आहेत. यावेळी 16 नवीन अब्जाधीशांपैकी तीन महिलांनी या यादीत स्थान मिळवले आहे.

याशिवाय केशब महिंद्रा फोर्ब्सच्या यादीत परतले असून ते सर्वात वयस्कर भारतीय अब्जाधीश आहेत. 99 वर्षीय केशब महिंद्रा यांची एकूण संपत्ती 1.2अब्ज डॉलर आहे. (Who is 99-year-old billionaire Keshub Mahindra, the oldest Indian on Forbes list)

कोण आहेत केशब महिंद्रा

केशब महिंद्रा, महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष आहेत, यूएसए, पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाचे पदवीधर आहेत. 1947 मध्ये कंपनीत रुजू झाल्यानंतर 1963 मध्ये ते चेअरमन झाले.

महिंद्राच्या वेबसाइटनुसार केशब महिंद्रा यांची केंद्रीय उद्योग सल्लागार परिषदेसह अनेक समित्यांवर काम करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. 2004 ते 2010 पर्यंत, ते पंतप्रधानांच्या व्यापार आणि उद्योग परिषदेचे, नवी दिल्लीचे सदस्य होते.

त्यांनी सेल, टाटा स्टील, टाटा केमिकल्स, इंडियन हॉटेल्स, आयएफसी आणि आयसीआयसीआयसह विविध कंपन्यांच्या बोर्ड आणि कौन्सिलवरही काम केले आहे.

यामध्ये 3 महिलांचा समावेश आहे :

फोर्ब्सच्या 2023 च्या भारतीय अब्जाधीशांच्या यादीत तीन महिलांचाही समावेश आहे. या महिलांमध्ये 59 वर्षीय रेखा झुनझुनवाला यांचा समावेश आहे.

रेखा झुनझुनवाला यांची संपत्ती 5.1अब्ज डॉलर होती. त्या दिवंगत राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी आहेत, जे शेअर बाजाराचे बिग बुल होते. राकेश झुनझुनवाला यांचे गेल्या वर्षी निधन झाले.

Forbes Billionaires
CNG-PNG Price Cut: सर्वसामान्यांना दिलासा! 'या' सात राज्यांमध्ये CNG-PNGच्या दरात मोठी घट

रोहिका मेस्त्री यांचाही समावेश :

याशिवाय दिवंगत अब्जाधीश पल्लोनजी मिस्त्री यांची सून रोहिका सायरस मिस्त्री यांनी प्रथमच फोर्ब्सच्या यादीत स्थान मिळवले आहे. टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या त्या पत्नी आहेत.

सर्वात तरुण अब्जाधीश :

या वर्षीच्या फोर्ब्सच्या यादीत सर्वात तरुण भारतीय अब्जाधीश आहेत 36 वर्षीय निखिल कामथ आणि त्यांचा मोठा भाऊ नितीन कामथ. दोन्ही भाऊ ब्रोकरेज झिरोधाचे सह-संस्थापक आहेत. निखिल यांची संपत्ती 1.1 अब्ज डॉलर आहे, तर नितीनची संपत्ती 2.7 बिलियन डॉलर आहे.

Forbes Billionaires
सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.