
70च्या दशकातील बालकलाकार अलंकार जोशीने ‘दीवार’सह अनेक चित्रपटांमध्ये लहान अमिताभची भूमिका साकारली.
मोठेपणी अभिनय सोडून त्यांनी अमेरिकेत जाऊन सॉफ्टवेअर क्षेत्रात करिअर केलं आणि स्वतःची टेक कंपनी उभी केली.
आज त्यांची संपत्ती 200 कोटी रुपयांहून अधिक असून मुलगी अनुजा जोशी हॉलिवूडमध्ये अभिनय करते.
Success Story of Alankar Joshi: 70च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत एक असा बालकलाकार होता, ज्याने ‘दीवार’, ‘सीता और गीता’ आणि ‘मजबूर’सारख्या सुपरहिट चित्रपटांत लहानपणीचा अमिताभ बच्चन साकारून प्रेक्षकांच्या मनात घर केलं. हा कलाकार म्हणजे मास्टर अलंकार उर्फ अलंकार जोशी. त्या काळात तो इंडस्ट्रीतील महत्त्वाचा बालकलाकार मानला जायचा.