
Who is Sashidhar Jagdishan: एचडीएफसी बँकेचे एमडी आणि सीईओ शशिधर जगदीशन यांच्याविरुद्ध आर्थिक फसवणुकीच्या आरोपाखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बँकेने हे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत.
बँकेने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीत असे म्हटले आहे की हे आरोप मेहता कुटुंबातील एका गटाने केले आहेत, ज्यांनी 1995 मध्ये बँकेकडून घेतलेले कर्ज फेडले नाही. मेहता कुटुंबाने लीलावती किर्तीलाल मेडिकल ट्रस्टमार्फत एचडीएफसीच्या एमडी आणि सीईओंविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.