​Zepto Unicorn: मित्रांची कमाल, झेप्टो कंपनी बनली 2023 ची पहिली युनिकॉर्न, आता IPO च्या तयारीत

​Zepto Unicorn: मंदीच्या काळात झेप्टोने हा निधी मिळवला आहे.
​Zepto Unicorn
​Zepto UnicornSakal

Startup Company : दोन वर्षांपूर्वी दोन मित्रांनी मिळून किराणा डिलिव्हरी कंपनी उघडली. ज्यांच्या मेहनतीला आता फळ मिळत आहे आणि त्यांनी यंदाच्या युनिकॉर्न क्लबमध्ये प्रवेश केला आहे. दोन वर्षांपूर्वी आदित पलिचा आणि कैवल्य वोहरा यांनी ऑनलाइन किराणा डिलिव्हरी स्टार्टअप Zepto सुरू केले.

सीरीज-ई फंडिंगद्वारे, कंपनीने 200 दशलक्ष डॉलर म्हणजेच रु. 16,528,330,800 उभारले आहेत. आता Zepto चे एकूण मूल्य 1.4 अब्ज डॉलर झाले आहे. यासह, झेप्टो कंपनी देखील 2023 वर्षातील पहिली युनिकॉर्न बनली आहे.

​Zepto Unicorn
Swiggy IPO: स्विगीची IPO एन्ट्री कधी होणार? तारीख आणि किंमतीसह सर्व माहिती एका क्लिकवर

स्टार्टअप्ससाठी निधी उभारणे कठीण होत असताना मंदीच्या काळात झेप्टोने हा निधी मिळवला आहे. एवढी मोठी गुंतवणूक अमेरिकन गुंतवणूकदार फर्म स्टेपस्टोन ग्रुपने केले आहे. इतकंच नाही तर स्टेपस्टोन ग्रुपचा भारतीय कंपनीतली पहिली गुंतवणूकआहे.

झेप्टोची स्थापना 2021 मध्ये स्टॅनफोर्ड विद्यापीठातील पदवीधर आदित पलिचा आणि कैवल्य वोहरा यांनी केली होती.

पुढील 2-3 वर्षात शेअर बाजारात लिस्ट करण्याचाही त्यांचा विचार आहे. झेप्टो देशभरातील वितरण केंद्रांच्या नेटवर्कद्वारे 10 मिनिटांत 6,000 हून अधिक किराणा उत्पादने वितरित करते.

​Zepto Unicorn
Startup Success Story: शिक्षण सोडले, 19व्या वर्षी 'किराणा स्टोअर' उघडून उभारली 7,300 कोटींची कंपनी

आदित पलिचा यांचा जन्म 2001 साली मुंबईत झाला. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी व्यवसाय करिअरला सुरुवात केली. आदितने संगणक अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली आहे.

तो अभ्यासासाठी अमेरिकेच्या स्टॅनफोर्डला गेला. पण स्टार्टअप सुरू करण्याच्या हट्टामुळे त्यानी अभ्यास अर्धवट सोडून गोपूल नावाचा स्टार्टअप सुरू केला.

एप्रिल 2021 मध्ये, आदित आणि त्याचा मित्र कैवल्य वोहरा यांनी झेप्टो या किराणा मालाच्या वितरणासाठी वेब प्लॅटफॉर्मची स्थापना केली. ऑपरेशनच्या एका महिन्यानंतरच या स्टार्टअपचे मूल्यांकन 200 दशलक्ष डॉलरपर्यंत पोहोचले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com