
जीएसटी परिषदेच्या ५६व्या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. देशात दिवाळीआधी सर्वसामान्यांसह व्यावसायिकांनाही दिलासा दिला आहे. जीएसटी स्लॅब कमी करत आता फक्त ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच स्लॅब ठेवण्यात आलेत. १२ टक्के आणि २८ टक्के स्लॅब रद्द करण्यात आलेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी या बदलांची माहिती दिलीय. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सांगितलं की, जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी रद्द करत तो शून्य करण्यात आलाय. त्यात जीवन रक्षक औषधे, विमा पॉलिसी, दूध, पनीर यांचा समावेश आहे. जीएसटीतील नवे बदल २२ सप्टेंबरपासून लागू केले जाणार आहेत.