
जेरोधा प्लॅटफॉर्मवर तांत्रिक बिघाड झाला, ज्यामुळे निफ्टी आणि स्टॉक्सचा डेटा ‘nil’ दाखवत होता.
युजर्सनी सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस पाडला आणि नितीन कामत यांच्यावर टीका केली.
कंपनीने नंतर समस्या सोडवल्याचे सांगून प्लॅटफॉर्म पुर्ववत झाल्याचे जाहीर केले.
Zerodha Down: देशातील सर्वात मोठी रिटेल ब्रोकिंग कंपनी जेरोधाच्या (Zerodha) ट्रेडिंग प्लॅटफॉर्ममध्ये सकाळी तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे स्टॉक आणि व्हॉल्यूम कोट्स दिसेनासे झाले आणि गुंतवणूकदार गोंधळले. सोशल मीडियावर मोठ्या संख्येने युजर्सनी तक्रारी केल्या. ‘DownDetector’ वेबसाईटवर सकाळी 9:40 पर्यंत तब्बल 8,143 तक्रारी आल्या होत्या.