Zomato GST Notice: जीएसटीने झोमॅटोला पाठवली 400 कोटींची नोटीस; काय आहे प्रकरण?

Zomato GST Notice: झोमॅटोला GST कडून कारणे दाखवा नोटीस मिळाली आहे. ही नोटीस 400 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. कंपनीने बुधवारी संध्याकाळी बीएसई फाइलिंगमध्ये जीएसटीकडून नोटीस मिळाल्याची माहिती दिली. गेल्या महिन्यात जीएसटी इंटेलिजन्स महासंचालनालयाने (DGGI) Zomato आणि Swiggy ला डिमांड नोटीस पाठवली होती.
Zomato GST Notice
Zomato GST NoticeSakal

Zomato GST Notice: झोमॅटोला GST कडून कारणे दाखवा नोटीस मिळाली आहे. ही नोटीस 400 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. कंपनीने बुधवारी संध्याकाळी बीएसई फाइलिंगमध्ये जीएसटीकडून नोटीस मिळाल्याची माहिती दिली.

गेल्या महिन्यात जीएसटी इंटेलिजन्स महासंचालनालयाने (DGGI) Zomato आणि Swiggy ला डिमांड नोटीस पाठवली होती. यामध्ये झोमॅटोला 400 कोटी रुपयांचा तर स्विगीला 350 कोटी रुपयांचा थकबाकी कर भरण्यास सांगण्यात आले होते.

डीजीजीआयचे म्हणणे आहे की Zomato आणि Swiggyला 18 टक्के दराने सेवांवर GST भरावा लागणार आहे. दोन्ही कंपन्या फक्त प्लॅटफॉर्म आहेत आणि ते फक्त कामगारांच्या वतीने वितरण शुल्क वसूल करतात.

Zomato ने एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, "डिलिव्हरी भागीदारांच्या वतीने कंपनीकडून डिलिव्हरी चार्जेस वसूल केले जात असल्याने ते कोणताही कर भरण्यास जबाबदार नाही. कंपनी कारणे दाखवा नोटीसला योग्य प्रतिसाद देईल."

Zomato GST Notice
Tata Motors: टाटा मोटर्सला यूपी सरकारकडून मिळाली मोठी ऑर्डर, शेअर्समध्ये आणखी तेजी येण्याची शक्यता

फूड डिलिव्हरी चार्जेसच्या नावाखाली ग्राहकांकडून वसूल केलेल्या शुल्कावर जीएसटी विभाग अन्न वितरण कंपन्यांकडून कराची मागणी करत आहे.

दुसरीकडे, Zomato आणि Swiggy सारख्या फूड डिलिव्हरी कंपन्यांचे म्हणणे आहे की त्यांनी डिलिव्हरी चार्जेस स्वतः घेतले नाहीत, उलट रेस्टॉरंट भागीदारांसाठी ग्राहकांकडून हे शुल्क आकारले आहे, त्यामुळे ते डिलिव्हरी शुल्कावर सेवा कर भरण्यास जबाबदार नाहीत.

Zomato GST Notice
EPFO चा मोठा निर्णय! Covid Advance सुविधा बंद! खाते गोठवण्यावरही कारवाई

जीएसटीची ही नोटीस 26 डिसेंबरला मिळाल्याचे कंपनीने म्हटले आहे. नोटीसमध्ये 402 कोटी रुपयांच्या थकित कराच्या मागणीबाबत झोमॅटोकडून उत्तर मागवण्यात आले आहे.

जीएसटी विभागाने 29 ऑक्टोबर 2019 ते 31 मार्च 2022 या कालावधीसाठी कंपनीकडून 402 कोटी रुपयांची कर मागणी का केली जाऊ नये, अशी सूचना कंपनीला केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com