GST Savings Festival
ESakal
Sakal Money
१२ लाखांपर्यंतची करमाफी, GST मध्ये सवलत अन् २.५ लाख कोटी वाचणार... कर सुधारणांना 'बचत महोत्सव' बोलण्याचं मोदींनी गणित सांगितलं
Narendra Modi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशाला संबोधित केले. त्यांनी उद्यापासून लागू होणाऱ्या नवीन पिढीच्या जीएसटी सुधारणांना जीएसटी बचत महोत्सव असे वर्णन केले.
जीएसटी सुधारणा लागू करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. त्यांच्या भाषणादरम्यान त्यांनी सांगितले की, सरकारने पूर्वी मध्यमवर्गाला १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर सवलत दिली होती. आता २२ सप्टेंबरपासून सरकार देशभरात जीएसटी सुधारणा राबवत आहे. त्यांनी पुढे सांगितले की, मध्यमवर्गासाठी हा दुहेरी वरदान आहे.

