महत्त्वाची बातमी! पेट्रोल ५ रुपये आणि डिझेल प्रति लिटर ३ रुपयांनी वाढले; दर कुणी वाढवले? जाणून घ्या सध्याची किंम्मत...

Petrol And Diesel Rate Hike: मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कंपनीने पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ₹५.३० आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ₹३ ने वाढ केली आहे.
Petrol Diesel Price Hike

Petrol And Diesel Rate Hike

ESakal

Updated on

Nayara Petrol Diesel Price Hike : भारतातील सर्वात मोठ्या खाजगी इंधन कंपन्यांपैकी एक असलेल्या नायरा एनर्जीने गुरुवारी पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ५ रुपयांनी आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ३ रुपयांनी वाढ केली. मध्य-पूर्वेतील युद्धानंतर जागतिक तेल दरात झालेल्या अलीकडील वाढीचा काही भार कंपनीने आपल्या ग्राहकांवर टाकला आहे. भारतातील इंधन विपणन कंपन्या दबावाखाली आहेत. २८ फेब्रुवारीपासून जागतिक कच्च्या तेलाच्या किमतीत जवळपास ५० टक्के वाढ होऊनही, किरकोळ पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com