

RBI
ESakal
भारतीय रिझर्व्ह बँकेने देशात परकीय चलन म्हणजेच डॉलर आणण्यासाठी एक नवीन योजना सुरू केली होती. एफसीएनआर नावाची ही योजना परदेशात राहणाऱ्या भारतीयांना त्यांचे परकीय चलन भारतात मुदत ठेवींच्या स्वरूपात जमा करण्याची परवानगी देते. या योजनेतून अपेक्षेपेक्षा जास्त निधी जमा झाला आहे. परिणामी आता ही योजना तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरबीआयने FCNR(B) ठेवींसाठीची स्वॅप सुविधा मुदतपूर्व बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.