
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील बहुतांश देशांवर टॅरिफ लागू केले आहे. ट्रम्प यांच्या निर्णय़ामुळे अमेरिकेतील नागरिकसुद्धा नाराज आहेत. दरम्यान, ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे भारताच्या रिझर्व्ह बँकेचंही गणित बिघडलंय. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची नुकतीच बैठक झाली. आरबीआयने रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. तीन दिवसांच्या बैठकीनंतर आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो रेटबाबत माहिती दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लागू करण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे जागतिक अस्थिरता निर्माण झालीय. ट्रम्प यांच्या निर्णयाने जागतिक बाजारात अनिश्चिततेचं वातावरण असताना व्याजदरात बदल न करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेनं घेतलाय. आरबीआयच्या निर्णयामुळे व्याजदर ५.५ टक्क्यांवर कायम राहिले.