Premium|Retail Investor Mistakes : गुंतवणूकदारांची चूक; उच्चांकावर खरेदी, नीचांकावर विक्रीचे चक्र थांबवायचे कसे?

stock market investment strategy : भारतीय शेअर बाजारातील छोट्या गुंतवणूकदारांची उच्चांकावर खरेदी आणि नीचांकावर विक्री करण्याची सवय कशी आहे आणि ज्यामुळे ते दीर्घकालीन संपत्ती निर्माण करू शकत नाहीत, यावर या लेखात ऐतिहासिक उदाहरणांसह मार्गदर्शन केले आहे.
Retail Investor Mistakes

Retail Investor Mistakes

esakal

Updated on

किरांग गांधी - kirang.gandhi@gmail.com

भारतीय शेअर बाजार गेल्या तीन दशकांपासून, एका विशिष्ट आणि अंदाज लावता येणाऱ्या लयीत फिरत आहेत. बाजारात मोठ्या तेजीनंतर तीव्र घसरण आणि त्यानंतर त्याहून मोठी तेजी येते. तरीही, छोट्या गुंतवणूकदारांचे वर्तन क्वचितच बदलले आहे. ते उशिरा बाजारात प्रवेश करतात आणि लवकर बाहेर पडतात. ते मोठ्या संधी गमावतात आणि केवळ तेव्हाच सहभागी होतात, जेव्हा पार्टी संपण्याच्या बेतात असते. यामागे नेमकी काय कारणे आहेत, गुंतवणूकदारांनी काय केले पाहिजे, याबाबत मार्गदर्शन...

भारतीय बाजाराने दीर्घकाळात असामान्य परतावा दिला आहे. १९९५ ते २०२५ या काळात सर्वांत मोठी शोकांतिका ही आहे, की बहुतेक छोट्या गुंतवणूकदारांनी ही संपत्ती कधीच मिळवली नाही. कारण ते नेहमीच चक्राच्या चुकीच्या बाजूला होते. उच्चांकावर खरेदी करत होते आणि नीचांकावर विक्री करत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com