

Sandwich Generation Financial Planning
esakal
पती, पुत्र आणि वडील अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडताना अनेकांना आपण कमी पडत असल्याची भीती नेहमीच असते. प्रत्येकासाठी आपण उपलब्ध नसण्याचा त्रासही होत असतो; त्याहीपेक्षा एक सँडविच जनरेशनचा प्रतिनिधी म्हणून नेहमीच मानसिक आणि आर्थिक दृष्टीने सर्वांशी जुळवून घ्यावे लागते. यात अनेक लोक स्वतःकडे दुर्लक्ष करतात. परंतु, यातून काहीच साध्य होत नाही. हे टाळायचे असेल, तर आर्थिक शिस्त बाळगणे आणि स्वतःची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
एडलवाइज लाइफ इन्शुरन्सने नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार, माझ्यासारख्या अनेक पिढ्यांना त्यांच्यासाठी पैसे खर्च न करता येण्याचा त्रास होतो, अधिकांश वेळी अगदी गरजांसाठीही पैसे उपलब्ध नसतात; पण सत्य हे आहे, की स्वत:च्या कल्याणाकडे दुर्लक्ष करण्याने काहीच साध्य होत नाही. उलट, आर्थिक तणाव किंवा अगदी वाईट स्थितीत भविष्यावरील अवलंबित्व वाढते म्हणूनच आपण स्वत:ची काळजी घेतल्यास ही सल कमी होण्यास मदत होऊ शकते. त्यासाठी काही महत्त्वाच्या बाबींचा अवलंब करणे गरजेचे आहे.