शेअर बाजार : ‘एसबीआय फंड्स’चा आयपीओ कसा आहे?

भारतातील सर्वात मोठ्या ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचा आयपीओ, मजबूत आर्थिक कामगिरी आणि वाढत्या फायनान्शियल ॲसेट मॅनेजमेंट क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांसाठी आकर्षक संधी
SBI Funds IPO opens from July 14 to July 16, offering investors a chance to invest in India's largest asset management company.

SBI Funds IPO opens from July 14 to July 16, offering investors a chance to invest in India's largest asset management company.

Sakal

Updated on

नंदिनी वैद्य, ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार INA000008880

भारतातील सर्वांत मोठी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी असलेल्या एसबीआय फंड्स मॅनेजमेंट कंपनीचा आयपीओ मंगळवारी, १४ जुलैपासून १६ जुलैपर्यंत प्राथमिक बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. कंपनीच्या ३१ मार्च २०२६ अखेरच्या आर्थिक आकडेवारीनुसार, म्युच्युअल फंड सेवा पोर्टफोलिओ मॅनेजमेंट आणि इतर सल्लागार सेवांसह एकूण तिमाही सरासरी व्यवस्थापित मालमत्ता २९.४६ लाख कोटी रुपये आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे १९.२ टक्के बाजारहिश्‍शासह मोठ्या शहरांसह छोट्या शहरांमध्येही कंपनीचे वर्चस्व आहे. या आयपीओसाठी ५४५ ते ५७४ रुपये किंमतपट्टा असून, कंपनीच्या कर्मचाऱ्यांना प्रतिशेअर ५४ रुपये सूट मिळणार आहे; तसेच आठ जुलै रोजी ‘एसबीआय’चे भागधारक असलेल्यांसाठी विशेष राखीव कोटा ठेवण्यात आला आहे. त्यानुसार असे गुंतवणूकदार आरआयआय किंवा एनआयआय कोट्यातून आणि भागधारकांसाठीच्या राखीव कोट्यातून असे दोन्हींकडून अर्ज करू शकतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com