Share Market Closing: विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर, शेअर बाजार लाल निशाण्यावर बंद, सेन्सेक्स-निफ्टी झाले कमकुवत

Sensex: गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. अशात आज सोमवारी विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर, शेअर बाजार लाल निशान्यावर बंद झाला असून, सेन्सेक्स-निफ्टी कमकुवत झाले आहेत.
Share Market Closing Bell
Share Market Closing BelleSakal
Updated on

गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. अशात आज सोमवारी विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर, शेअर बाजार लाल निशान्यावर बंद झाला असून, सेन्सेक्स-निफ्टी कमकुवत झाले आहेत.

शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी, दोन्ही प्रमुख निर्देशांक BSE सेन्सेक्स आणि NSE निफ्टी लाल रंगात राहिले. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) चा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 203.28 अंकांनी किंवा 0.27 टक्क्यांनी घसरून 76,490.08 वर बंद झाला.

त्याच वेळी, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चा निर्देशांक निफ्टी 50, 30.95 अंकांच्या किंवा 0.13 टक्क्यांच्या घसरणीसह 23,259.20 च्या पातळीवर बंद झाला.

शिवाय, निफ्टी 50 कंपन्यांमधील 50 पैकी 23 शेअर्स लाल रंगात बंद झाले. यापैकी टेक महिंद्रा, इन्फोसिस, विप्रो, लिमिंद्रे आणि बजाज फायनान्सचे शेअर्स सर्वाधिक घसरले. तर अल्ट्राटेक सिमेंट, ग्रासिम इंडस्ट्रीज, हिरो मोटोकॉर्प, सिप्ला आणि पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनचे शेअर्स सर्वाधिक वाढले.

Share Market Closing Bell
Gold-Silver: चांदी ठरली वरचढ! सोन्याला टाकले मागे; का ठरत आहे सर्वांच्या आवडीची?

बाजार बंद होण्याच्या शेवटी, BSE सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी अर्ध्याहून अधिक शेअर्स लाल रंगात बंद झाले. यामध्ये टेक महिंद्रा, इन्फोसिस, विप्रो, बजाज फायनान्स आणि महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स सर्वाधिक घसरले. तर अल्ट्राटेक सिमेंट, पॉवर ग्रिड कॉर्प, नेस्ले इंडिया, एनटीपीसी आणि टाटा स्टीलचे शेअर्स सर्वाधिक वाढले.

शुक्रवारच्या तुलनेत सोमवारी भारतीय रुपया 13 पैशांनी घसरून प्रति डॉलर 83.51 वर बंद झाला. सकाळी रुपया 11 पैशांच्या कमजोरीसह 83.48 प्रति डॉलरवर उघडला. तर, शुक्रवारी रुपया प्रति डॉलर 83.45 वर स्थिर उघडला होता, तर संध्याकाळी 9 पैशांनी वाढून 83.38 प्रति डॉलरवर बंद झाला.

Share Market Closing Bell
Share Market Opening: मोदी 3.0 च्या शपथविधीनंतर शेअर बाजारात ऐतिहासिक उच्चांक... सेन्सेक्स पहिल्यांदाच 77 हजारांचा टप्पा पार, निफ्टी 23400 च्या वर

सकाळी बाजार विक्रमी उच्चांकासह उघडला. या काळात सेन्सेक्स 373.15 अंकांच्या किंवा 0.49 टक्क्यांच्या वाढीसह 77,066.51 च्या पातळीवर उघडला होता. तर निफ्टी 115.40 अंकांच्या म्हणजेच 0.50 टक्क्यांच्या वाढीसह 23,405.60 च्या पातळीवर उघडला होता.

तर, शेवटच्या सत्रात (07 जून 2024, शुक्रवार) बाजार सपाट पातळीवर उघडला आणि संध्याकाळी बाजार प्रचंड वाढीसह बंद झाला. या कालावधीत सेन्सेक्स 5.13 अंकांनी किंवा 0.01 टक्क्यांनी वाढला आणि 76,688.23 च्या पातळीवर बंद झाला. तर, निफ्टी 28.00 अंकांनी म्हणजेच 0.12 टक्क्यांनी वाढून 23,318.15 च्या पातळीवर बंद झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com