Stock Market: NSEचा गुंतवणूकदारांना इशारा! स्टॉकची शिफारस करणाऱ्या डीपफेक व्हिडिओपासून रहा सावध

Stock Market: भारताच्या नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने (NSE) बुधवारी गुंतवणूकदारांना शेअर बाजारात गुंतवणुकीचा सल्ला देणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या (CEO) डीपफेक व्हिडिओंपासून सावध केले आहे.
Beware of deepfake of CEO recommending stocks, says National Stock Exchange
Beware of deepfake of CEO recommending stocks, says National Stock Exchange Sakal

Stock Market: भारताच्या नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने (NSE) बुधवारी गुंतवणूकदारांना शेअर बाजारात गुंतवणुकीचा सल्ला देणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या (CEO) डीपफेक व्हिडिओंपासून सावध केले आहे. गुंतवणुकीचा सल्ला देणाऱ्या काही व्हिडिओंमध्ये सीईओ आशिषकुमार चौहान यांचा चेहरा आणि आवाज चुकीचा वापरला जात असल्याचे निरीक्षण केल्यानंतर देशातील नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने हा इशारा दिला आहे.

"आशिषकुमार चौहानच्या आवाजाचे आणि चेहऱ्यावरील हावभावांचे अनुकरण करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून असे व्हिडिओ तयार केले गेले आहेत," असे NSE ने म्हटले आहे. (Beware of deepfake of CEO recommending stocks, says National Stock Exchange)

भारतातील इक्विटी बाजार विक्रमी उच्चांकावर व्यापार करत आहेत आणि गुंतवणूकदारांचा सहभाग अलिकडच्या काही वर्षांत वाढला आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करणाऱ्या स्टॉक ईन्फ्लुएन्सर बद्दल चिंता निर्माण झाली आहे.

Beware of deepfake of CEO recommending stocks, says National Stock Exchange
Tesla in India: इलॉन मस्क पुण्यात उभारणार टेस्लाचा प्रकल्प? मुकेश अंबानींशी चर्चा सुरु

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये, बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने सांगितले होते की गुंतवणूकदारांनी स्टॉक ईन्फ्लुएन्सरपासून दूर राहावे.

फंड हाऊस ICICI प्रुडेन्शियल ॲसेट मॅनेजमेंट कंपनीने जानेवारीमध्ये गुंतवणूकदारांना स्टॉकची शिफारस करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या डीपफेक व्हिडिओ विरुद्ध इशारा दिला होता. फंड हाऊसने सांगितले की "काही अनधिकृत व्हिडिओ विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर प्रसारित केले गेले आहेत, ज्यात शेअर बाजारातील शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे,"

Beware of deepfake of CEO recommending stocks, says National Stock Exchange
Aadhaar ATM: पैसे काढण्यासाठी बँक आणि ATMमध्ये जाण्याची गरज नाही; अशा प्रकारे मिळवा घरबसल्या कॅश

डीपफेक तंत्रज्ञान काय आहे?

डीपफेक तंत्रज्ञानाने फोटो आणि व्हिडिओमध्ये बदल केला जातो. याला सिंथेटिक किंवा डॉक्टरेड फोटो-व्हिडिओ (मीडिया) म्हणतात. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरून चुकीची माहिती दिली जाते. (National Stock Exchange cautions against deepfake videos of its MD and CEO recommending stocks)

अलीकडेच पंतप्रधान मोदींचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता. तसेच आघाडीच्या कलाकारांचे अनेक 'डीपफेक' व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. डीपफेक फोटो-व्हिडिओची वाढती प्रकरणे पाहता तंत्रज्ञानाच्या गैरवापरावर चिंता व्यक्त केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com