
महाराष्ट्र सरकारने 21 जुलै 2025 पासून सार्वजनिक ट्रस्टना त्यांच्या निधीपैकी 50% रक्कम म्युच्युअल फंड, इक्विटी आणि बॉण्ड्समध्ये गुंतवण्याची परवानगी दिली.
राज्यातील 59,143 नोंदणीकृत ट्रस्टकडून ₹5,000 ते ₹10,000 कोटींची गुंतवणूकक्षम भांडवल बाजारात येण्याची शक्यता.
या निर्णयामुळे म्युच्युअल फंड आणि डेट मार्केटसाठी नवा गुंतवणूकदार वर्ग तयार होईल.
Temple and Charity Trusts: महाराष्ट्रातील धार्मिक संस्था, समाजकल्याण संघटना आणि शैक्षणिक धर्मादाय ट्रस्ट आता पारंपरिक बँक ठेवी आणि पोस्ट ऑफिस योजनांपुरते मर्यादित राहणार नाहीत. 21 जुलै 2025 पासून राज्य सरकारने सार्वजनिक ट्रस्टना त्यांच्या एकूण निधीपैकी 50% पर्यंत रक्कम म्युच्युअल फंड आणि शेअर बाजाराशी निगडित इक्विटीमध्ये गुंतवण्याची परवानगी दिली आहे.
हा निर्णय चॅरिटी कमिशनर कार्यालयाने जाहीर केलेल्या आदेशाद्वारे लागू करण्यात आला आहे. यामुळे ट्रस्टना आधुनिक गुंतवणूक धोरणांशी सुसंगत पद्धतीने पोर्टफोलिओ हाताळता येईल,