
अल्ट्राटेक सीमेंटने सेबीच्या नियमांचे पालन करण्यासाठी इंडिया सीमेंट्समधील 6.5% हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला आहे.
कंपनी 740 कोटी रुपयांचे शेअर्स दोन दिवसांत विकणार असून किंमत 368 रुपये प्रति शेअर ठरवली आहे.
या घोषणेनंतर इंडिया सीमेंट्सचा शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला.
UltraTech Cement: देशातील मोठे उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांच्या अल्ट्राटेक सीमेंट कंपनीने इंडिया सीमेंट्समधील मोठा हिस्सा विकण्याची तयारी केली आहे. कंपनी 740 कोटी रुपयांचे शेअर्स विकणार असून हा निर्णय बाजार नियंत्रक सेबीच्या नियमांचे पालन करण्यासाठी घेतला आहे.