IPO News: 5 ऑक्टोबरला खुला होणार ब्लू जेट हेल्थकेअरचा IPO, कंपनीची संपूर्ण माहिती एका क्लिकवर
Blue Jet Healthcare IPO: ब्लू जेट हेल्थकेअर (Blue Jet Healthcare) या कच्च्या मालाची निर्मिती करणाऱ्या कंपनीचा आयपीओ 25 ऑक्टोबरला सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार आहे. गुंतवणूकदारांना 27 ऑक्टोबरपर्यंत आयपीओत गुंतवणूक करण्याची संधी असेल.
त्याच वेळी, हा आयपीओ 23 ऑक्टोबरला एका दिवसासाठी अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला असेल. आयपीओ पूर्णपणे ओएफएसवर आधारित असल्याने, इश्यूमधून मिळणारी संपूर्ण रक्कम शेअर्सची विक्री करणाऱ्या शेअरधारकांकडे जाईल.
पब्लिक इश्यूमध्ये प्रमोटर अक्षय बन्सरीलाल अरोरा आणि त्यांचा मुलगा शिवेन अक्षय अरोरा यांच्या 2.4 कोटी इक्विटी शेअर्सचा ऑफर-फॉर-सेल (OFS) समावेश आहे. या आयपीओ अंतर्गत नवीन शेअर्स जारी केले जाणार नाहीत. याची 100 टक्के मालकी अरोरा कुटुंबाकडे आहे.
इश्यूचा निम्मा आकार QIB साठी, 15 टक्के हाय नेटवर्थ इंडिविज्युअल्ससाठी आणि उर्वरित 35 टक्के रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी, आयसीआयसीआय सिक्युरिटीज आणि जेपी मॉर्गन इंडिया या ऑफरचे मर्चंट बँकर आहेत, तर लिंक इनटाइम इंडिया या इश्यूचे रजिस्ट्रार आहेत.
ब्लू जेट 1 नोव्हेंबरपर्यंत यशस्वी गुंतवणूकदारांना आयपीओ शेअर्सचे वाटप करू शकते. त्याच वेळी, इक्विटी शेअर्स 3 नोव्हेंबरपर्यंत यशस्वी गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यांमध्ये जमा केले जातील. बीएसई आणि एनएसई वर इक्विटी शेअर्सची ट्रेडिंग 6 नोव्हेंबरपासून सुरू होईल, जी आयपीओ शेड्युल्डनुसार टी+6 टाइमलाइन आहे.
ब्लू जेट हेल्थकेअरची स्थापना 1968 मध्ये झाली. ब्लूजेटने विशेष रासायनिक क्षमता असलेले कॉन्ट्रॅक्ट डेव्हलपमेंट आणि मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन (CDMO) व्यवसाय मॉडेल उभे केले.
महाराष्ट्रात तीन उत्पादन प्रकल्पांसह, कंपनी अनेक जागतिक आणि देशांतर्गत ग्राहकांना सेवा देते. यामध्ये GE Healthcare AS, Guerbet Group, Bracco Imaging Spa, Colgate-Pammolive (India), Unilever, Prinova US LLC आणि MMAG कंपनी यांचा समावेश आहे.
नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.