ED BYJU's Raid: ईडीच्या छाप्यावर बायजूने दिले स्पष्टीकरण; म्हणाले, कर्मचाऱ्यांनी...

रवींद्रन बायजू यांच्या बंगळुरू येथील कार्यालय आणि निवासी परिसरात ही झडती घेण्यात आली होती
ED BYJU's Raid
ED BYJU's RaidSakal

ED BYJU's Raid: अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) कारवाईनंतर दुसऱ्याच दिवशी एज्युटेक स्टार्टअप बायजूने आपले स्पष्टीकरण सादर केले आहे. कंपनीचे सीईओ रवींद्रन बायजू यांनी रविवारी याबाबत कर्मचाऱ्यांना उद्देशून पत्र लिहिले आहे.

कंपनीच्या वतीने कोणतीही हेराफेरी किंवा कोणत्याही प्रकारची गडबड झाली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. रवींद्रन यांनी सांगितले की ईडीची कारवाई ही फेमा अंतर्गत केलेली चौकशी आहे. जी माहिती मागवली होती, ती यापूर्वीच प्रतिनिधींनी सादर केली होती.

बायजूचे सीईओ म्हणाले की कंपनीने गेल्या काही वर्षांत देशाबाहेर अनेक व्यवहार केले आहेत, जे कंपनीच्या धोरणाचा एक भाग आहे. या व्यवहारांनी कंपनीचा प्रभाव वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या व्यवहारांना वित्तपुरवठा करण्यासाठी आम्ही काही निधी देशाबाहेर पाठवला आहे. असे वृत्त India Today ने दिले आहे.

रवींद्रन यांच्या घराची झडती घेण्यात आली:

ईडीने एक दिवसापूर्वी म्हणजेच शनिवारी बायजूच्या तीन ठिकाणांवर झडती घेतल्याचे निवेदन जारी केले होते. या कारवाईदरम्यान एजन्सीला अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे आणि संशयास्पद डेटा मिळाला आहे.

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्रन बायजू यांच्या बंगळुरू येथील कार्यालय आणि निवासी परिसरात ही झडती घेण्यात आली.

ED BYJU's Raid
Adani Group Row: अदानी प्रकरणाच्या तपासासाठी सेबीने मागितली आणखी 6 महिन्यांची मुदत, काँग्रेसने केली टीका

'या' पैशांवर ईडीला संशय आहे:

तपास यंत्रणेने निवेदनात सांगितले होते की, रवींद्रन बायजू यांना अनेक समन्स पाठवण्यात आले होते, परंतु ते कधीही ईडीसमोर हजर झाले नाहीत.

झडती दरम्यान असे आढळून आले की थिंक अँड लर्न प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला 2011 ते 2023 दरम्यान थेट विदेशी गुंतवणूक (FDI) अंतर्गत सुमारे 28,000 कोटी रुपये प्राप्त झाले. या कालावधीत कंपनीने थेट विदेशी गुंतवणुकीच्या नावाखाली सुमारे 9,754 कोटी रुपये देशाबाहेर पाठवले.

कंपनीने जाहिरात आणि मार्केटिंगच्या नावावर सुमारे 944 कोटी रुपये खर्च दाखवला आहे, त्यात देशाबाहेर पाठवलेल्या रकमेचाही समावेश होता. या माहितीत कंपनीने काही चुका केल्या आहेत, असे एजन्सीला वाटते.

सीईओंनी कर्मचाऱ्यांना आश्वासन दिले:

बायजूने काल सांगितले होते की ईडीची कारवाई ही नियमित तपासणी आहे आणि कंपनीने एजन्सीसह पूर्ण पारदर्शकता घेतली आहे. कंपनीने मागितलेली सर्व माहिती दिली आहे. रवींद्रन यांनी ताज्या पत्रातही या गोष्टींचा पुनरुच्चार केला आहे.

त्यांनी म्हटले आहे की कंपनीने लागू असलेल्या सर्व विदेशी चलन कायद्यांचे पूर्णपणे पालन करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आहे. अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत असल्याची ग्वाहीही त्यांनी कर्मचाऱ्यांना दिली.

ED BYJU's Raid
Silicon Bank दिवाळखोरीः भारतावर नाही होणार दीर्घकालिन परिणाम...का ते वाचा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com