Diwali 2023 Muhurat Trading: सेन्सेक्समध्ये 350 अंकांची वाढ, निफ्टी 19,500 च्या वर, सर्व क्षेत्रात तेजी

Diwali 2023 Muhurat Trading: दिवाळीच्या मुहूर्तावर बाजार तेजीसह खुला झाला आहे.
Diwali 2023 Muhurat Trading Sensex up over 400; Nifty firm above 19,500; all Nifty50 stocks in green
Diwali 2023 Muhurat Trading Sensex up over 400; Nifty firm above 19,500; all Nifty50 stocks in green Sakal

Diwali 2023 Muhurat Trading:  दिवाळीच्या मुहूर्तावर बाजार तेजीसह खुला झाला. निफ्टी 121.90 अंक किंवा 0.63 टक्क्यांच्या वाढीसह 19529.50 च्या आसपास दिसत आहे. तर सेन्सेक्स 345.23 अंकांच्या किंवा 0.53 टक्क्यांच्या वाढीसह 65,249.91 वर उघडला.

बँकिंग शेअर्समध्येही चांगली वाढ दिसून येत आहे. बँक निफ्टी 0.37 टक्क्यांच्या वाढीसह 43983 वर दिसत आहे. बाजारात चौफेर खरेदी होताना दिसत आहे.

निफ्टी ऑटो इंडेक्स 0.69 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे. तर फायनान्शिअल सर्व्हिसेस इंडेक्स 0.41 टक्के, निफ्टी एफएमसीजी इंडेक्स 0.44 टक्के, निफ्टी आयटी इंडेक्स 0.65 टक्के, निफ्टी मीडिया इंडेक्स 0.92 टक्के, निफ्टी मेटल 0.79 टक्के, निफ्टी फार्मा 0.76 टक्के, निफ्टी पीएसयू बँक 0.61 टक्के, रिअल बँक 0.61टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहेत.

गेल्या दिवाळीपासून आत्तापर्यंत म्हणजेच संवत 2079 मध्ये निफ्टीत 9.4 टक्क्यांची वाढ झाली आहे. लघु आणि मध्यम निर्देशांकांची कामगिरी अधिक चांगली झाली आहे. निफ्टी मिडकॅपने 32 टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांकाने 37 टक्के परतावा दिला आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांच्या एकूण संपत्तीत 45.87 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

Diwali 2023 Muhurat Trading Sensex up over 400; Nifty firm above 19,500; all Nifty50 stocks in green
Muhurat Trading 2023: मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी गुंतवणूकदारांना फायदा होतो का? असा आहे 10 वर्षांचा रेकॉर्ड

काय आहे अंदाज?

मोतीलाल ओसवाल यांच्या अहवालानुसार जगभरात सुरू असलेल्या अनिश्चिततेनंतरही भारतीय बाजार तेजीत राहील आणि देशांतर्गत बाजार कामगिरीच्या बाबतीत इतर प्रमुख शेअर बाजारांना मागे टाकेल.

ब्रोकरेज हाऊस ICICI डायरेक्टने अंदाज वर्तवला आहे की पुढील दिवाळीपर्यंत निफ्टी 50 21500 च्या पातळीपर्यंत वाढू शकतो. यातून बँका, भांडवली वस्तू, पायाभूत सुविधा आणि ऊर्जा क्षेत्रांची कामगिरी चांगली राहण्याची अपेक्षा आहे.

दुसरीकडे, ब्रोकरेज हाऊसने काही क्षेत्रांपासून दूर राहण्यास सांगितले आहे ज्यामध्ये परदेशी धोरणाचा परिणाम शेअर्सवर होतो, यामध्ये आयटी आणि तेल आणि गॅस क्षेत्रांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com