Share Update : घसरत्या बाजारात 'या' कंपनीला इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर ; शेअरमध्ये दमदार तेजीचा तज्ज्ञांना विश्वास...

भारतातील पहिली इलेक्ट्रिक बस निर्माती ऑलेक्ट्रा ग्रीनटेकला (Olectra Greentech) कमजोर बाजारपेठेत मोठी ऑर्डर मिळाली आहे.
Share Update
Share Updatesakal

भारतातील पहिली इलेक्ट्रिक बस निर्माती ऑलेक्ट्रा ग्रीनटेकला (Olectra Greentech) कमजोर बाजारपेठेत मोठी ऑर्डर मिळाली आहे. स्टॉक मार्केटला दिलेल्या माहितीनुसार, ऑलेक्ट्राला आसाम स्टेट ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनकडून (ASTC) 10 इलेक्ट्रिक बसेसच्या पुरवठ्यासाठी ऑर्डर प्राप्त झाली आहे. हा एक मल्टीबॅगर स्टॉक आहे. या शेअरने 3 वर्षांत गुंतवणूकदारांना 700 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

कंपनीला आसाम स्टेट ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनकडून (ASTC) 10 इलेक्ट्रिक बसेसचा संपूर्ण पुरवठा करण्यासाठी LoA प्राप्त झाला आहे. या बसेसची डिलिव्हरी 90 दिवसांत करायची आहे. 10 इलेक्ट्रिक बसेसची किंमत 15.14 कोटी आहे. ऑलेक्ट्रा ग्रीनटेकला गेल्या महिन्यात बेस्टकडून 400 इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा, ऑपरेशन आणि मेन्टेनन्स करण्याची ऑर्डर मिळाली होती. येत्या 18 महिन्यांत त्याचा पुरवठा केला जाईल.

Share Update
IPO Open : विश्वास ॲग्री सीड्सचा आयपीओ 21 मार्चपासून खुला होणार, अधिक जाणून घेऊयात...

ही ऑर्डर 4000 कोटीची आहे. यापूर्वी कंपनीला वसई विरार शहर महानगरपालिकेकडून 63 कोटीच्या 40 इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर मिळाली होती. ऑलेक्ट्रा ग्रीनटेकची ऑर्डर बुक मजबूत आहे. कंपनीला सातत्याने ऑर्डर्स मिळत आहेत. कंपनीची वार्षिक 1500 बस तयार करण्याची क्षमता आहे.

ऑलेक्ट्रा ग्रीनटेकचे शेअर्स सध्या 1708.60 रुपयांवर ट्रेड करत आहेत. स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 2,222 रुपये आणि नीचांक 612 रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप सुमारे 14,024.31 कोटी आहे. या एका महिन्यात हा शेअर 20 टक्क्यांनी घसरला आहे. मात्र, मागच्या 3 महिन्यांत 34 टक्के, 6 महिन्यांत 37 टक्के आणि एका वर्षात 170 टक्के वाढ झाली आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com