
Insider Trading Charges: अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी यांचा पुतण्या प्रणव अदानी याच्यावर इनसायडर ट्रेडिंगचा आरोप आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, सेबीने म्हटले आहे की प्रणव अदानी याने मे 2021मध्ये अदानी ग्रीनने खरेदी केलेल्या एसबी एनर्जी बद्दलची गोपनीय माहिती लीक केली होती. गौतम अदानी यांच्या पुतण्याने ही माहिती त्यांचे मेहुणे कुणाल शाह आणि त्यांचे भाऊ नृपाल शाह यांच्यासोबत शेअर केली होती.