

Gold Silver Rate India
sakal
Gold Rate Below 1 Lakh : नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण सुरू झाली आहे. त्यामुळे दागिने खरेदी करणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांना काहीसा दिलासा मिळत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी आणि मंगळवारी बाजार सुरू होताच सोन्या-चांदीच्या दरात वाढ नोंदविण्यात आली होती. मात्र, आज (बुधवारी) बाजार उघडताच सोने चांदीच्या दरात पुन्हा घसरण सुरू पहायला मिळाली.