Gold Silver Price Drop : जानेवारीचा शेवट गोड! ४८ तासांत सोने १९ हजार तर चांदी ९१ हजारांची घसरण; दर घसरणीमागील प्रमुख कारणे

Gold Silver Rate : बुलियन बाजारात मोठी उलथापालथ! सोन्या-चांदीच्या दरात ऐतिहासिक घसरण झाली आहे. सोनं ₹१९ हजारांनी तर चांदी ₹९१ हजारांनी घसरली. जाणून घ्या प्रमुख कारणे.
Gold & Silver Prices Crash

Gold & Silver Prices Crash

esakal

Updated on

January End Gold Silver Price Fall : सोने बाजारात ४८ तासांपूर्वी चांदीने भावाचा उच्चांक गाठत ती ‘जीएसटी’सह प्रतिकिलो चार लाखांवर पोहोचली होती, तर सोने (प्रति दहा ग्रॅम) एक लाख ८३ हजार रुपयांवर पोहोचले होते. आतापर्यंतचा भावाचा हा ऐतिहासिक उच्चांक होता. मात्र, गेल्या दोन दिवसांत (३० व ३१ जानेवारी) हा वाढलेला भाव कमी झाला आहे. दोन दिवसांत चांदीच्या भावात तब्बल ९० हजार ९०० रुपयांची (प्रती किलो) तर सोन्यात १८ हजार ९०० रुपयांची (प्रतिदहा ग्रॅम) घट झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com