Tips Industries च्या शेअरमध्ये खरेदी करण्याची चांगली संधी, तज्ज्ञांना विश्वास...

गुरुवारीही त्याचे शेअर्स 1.25 टक्क्यांनी वाढले आणि एनएसईवर हा शेअर 1,670.25 रुपयांवर बंद झाला.
Tips Industries
Tips Industriessakal

Tips Industries : फिल्म प्रॉडक्शन आणि डिस्ट्रीब्यूशनशी संबंधित असलेल्या टिप्स इंडस्ट्रीजने (Tips Industries) स्टॉक स्प्लिटची घोषणा केली आहे. कंपनीच्या बोर्डाने नुकत्याच झालेल्या बैठकीत 1:10 च्या प्रमाणात स्टॉक स्प्लिट करण्याचा निर्णय घेतला. टिप्स इंडस्‍ट्रीज हा एक मल्‍टीबॅगर स्‍टॉक आहे ज्याने त्याच्या गुंतवणूकदारांना तगडा परतावा दिला आहे.

गुरुवारीही त्याचे शेअर्स 1.25 टक्क्यांनी वाढले आणि एनएसईवर हा शेअर 1,670.25 रुपयांवर बंद झाला. टिप्स इंडस्ट्रीज ही स्मॉल कॅप कंपनी असून तिचे मार्केट कॅप 2,162 कोटी आहे. (great opportunity to buy in Tips Industries shares share market news)

Tips Industries
Stock Market Holiday: तीन दिवस शेअर बाजार राहणार बंद; जाणून घ्या पूर्ण वेळापत्रक

स्टॉक स्प्लिट 1:10 च्या प्रमाणात असेल. 10 रुपये फेस व्हॅल्यूचा शेअर प्रत्येकी 1 रुपये फेस व्हॅल्यूच्या 10 शेअर्समध्ये स्प्लिट केला जाईल. स्प्लिटनंतर प्रत्येक शेअरहोल्डरला एका शेअरसाठी 10 शेअर्स मिळतील. यासाठी 21 एप्रिल 2023 ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे.

अलीकडच्या काळात टिप्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. गेल्या एका महिन्यात 8% परतावा दिला आहे. त्याचवेळी, गेल्या 1 वर्षात गुंतवणूकदारांना 17 टक्के तोटा सहन करावा लागला आहे. पण लाँग टर्ममध्ये या स्टॉकने स्वतःला मल्टीबॅगर असल्याचे सिद्ध केले आहे. या शेअरने गेल्या 3 वर्षात तब्बल 1982% परतावा दिला आहे.

Tips Industries
Share Market Investment Tips: बाजार सुरु होण्याआधी आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म? जाणून घ्या

तीन वर्षांच्या कालावधीत गुंतवणूकदारांचा पैसा जवळपास 20 पटीने वाढला आहे. एप्रिल 2020 मध्ये, त्याच्या शेअरची किंमत 80.20 रुपये होती. पण आता त्याची किंमत 1670.25 रुपये इतकी वाढली आहे. तुम्ही एप्रिल 2020 मध्ये या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे 20 लाख झाले असते.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com