Gujarat Gas Share: गुजरात गॅसच्या शेअर्समध्ये दमदार तेजी; काय आहे कारण?

Gujarat Gas Share: गुजरात गॅसच्या (Gujarat Gas) शेअर्समध्ये सध्या चांगलीच तेजी दिसून येत आहे. हा शेअर गुरुवारी 3.15 टक्क्यांनी वाढून 565.95 रुपयांवर बंद झाला. वास्तविक, सिटी गॅस डिस्ट्रीब्यूशन फर्मने इंडस्ट्रियल गॅसच्या किंमती पर स्टँडर्ड क्यूबिक मीटर (scm) 3.5 रुपयांनी कमी केल्या आहेत.
gujarat gas share price jump 3 percent as company slashes industrial gas prices by 8 percent
gujarat gas share price jump 3 percent as company slashes industrial gas prices by 8 percentSakal
Updated on

Gujarat Gas Share: गुजरात गॅसच्या (Gujarat Gas) शेअर्समध्ये सध्या चांगलीच तेजी दिसून येत आहे. हा शेअर गुरुवारी 3.15 टक्क्यांनी वाढून 565.95 रुपयांवर बंद झाला. वास्तविक, सिटी गॅस डिस्ट्रीब्यूशन फर्मने इंडस्ट्रियल गॅसच्या किंमती पर स्टँडर्ड क्यूबिक मीटर (scm) 3.5 रुपयांनी कमी केल्या आहेत.

या कपातीनंतर, किंमत 45.42/scm वरून 41.68/scm वर आली आहे. अशा प्रकारे किंमती 8 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. या किंमतीतील कपातीनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये चांगली खरेदी दिसून आली आहे.

कंपनीच्या औद्योगिक गॅस व्हॉल्यूम वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आर्थिक वर्ष 2023-2024 च्या तिसऱ्या तिमाहीत व्हॉल्यूममध्ये घट झाली आहे.

किंमतीत कपात केल्यानंतर गॅसची किंमत स्वस्त झाली आहे. स्पर्धेला समजून घेऊन, कंपनीने आपला बाजारातील हिस्सा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि हायर व्हॉल्यूमसाठी इंडस्ट्रियल गॅसच्या किंमती कमी करण्यासाठी पावले उचलली आहेत.

gujarat gas share price jump 3 percent as company slashes industrial gas prices by 8 percent
Real Estate: चीन बुडतंय ? भारतातील रियल इस्टेट क्षेत्राने धडा शिकणे गरजेचे, काय घडतंय नेमकं

किंमतीत कपात झाली असली तरी गुजरात गॅसचे मार्जिन मजबूत राहील असे विश्लेषकांचे मत आहे. अशात ब्रोकिंग फर्म युबीएसने गुजरात गॅस स्टॉकचे रेटिंग 'सेल' वरून 'न्यूट्रल' केले आहे. ब्रोकरेजने त्याचे टारगेट 380 रुपयांवरून 610 रुपये प्रति शेअर केले आहे.

गेल्या एका महिन्यात गुजरात गॅसचे शेअर्स 2 टक्क्यांनी घसरले आहेत. मात्र, गेल्या 6 महिन्यांत 23 टक्के परतावा दिला आहे. गेल्या 4 महिन्यांत हा शेअर 40 टक्क्यांनी वाढला आहे. या वर्षात आतापर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये 17 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याशिवाय गेल्या 5 वर्षांत 317 टक्के नफा झाला आहे.

gujarat gas share price jump 3 percent as company slashes industrial gas prices by 8 percent
IPO News: गोपाल स्नॅक्स लिमिटेडचा आयपीओ 6 मार्चपासून होणार खुला; पैसे गुंतवण्यापूर्वी जाणून घ्या तपशील

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com