HDFC Bank: देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकेला 4 दिवसांत 1 लाख कोटी रुपयांचे नुकसान, काय आहे कारण?

HDFC Bank Market Cap: एचडीएफसी बँकेचे मार्केट कॅप 11.59 लाख कोटी रुपये आहे.
HDFC
HDFCSakal

HDFC Bank Market Cap: HDFC बँक ही भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. HDFC बँकेचे शेअर्स गेल्या काही दिवसांत 6 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. बँकेच्या मार्केट कॅपमध्ये सुमारे एक लाख कोटी रुपयांची घसरण झाली आहे.

देशांतर्गत ब्रोकरेज कंपन्या अजूनही एचडीएफसी बँकेच्या शेअर्सबद्दल आशावादी आहेत. बीएसईच्या आकडेवारीनुसार, सध्या एचडीएफसी बँकेचे मार्केट कॅप 11.59 लाख कोटी रुपये आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

HDFC बँकेचे शेअर्स शुक्रवारी 1,557 रुपयांवर उघडले आणि 2.11 टक्क्यांच्या घसरणीसह 1,524 रुपयांच्या नीचांकी पातळीवर आले. शेअर बाजार बंद झाला तेव्हा बँकेचे शेअर्स 1.57 टक्क्यांच्या घसरणीसह 1,529 रुपयांवर बंद झाले.

एचडीएफसी बँकेने गेल्या सोमवारी विश्लेषकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत एचडीएफसी बँकेने सांगितले की त्यांचे नेट वर्थ आणि मालमत्तेमध्ये अल्पावधीत घसरण होऊ शकते.

HDFC
Adani Group: अदानींना बाप्पा पावले! राज्य सरकारने दिला मोठा प्रोजेक्ट, तब्बल 'एवढया' कोटींची झाली डील

या आठवड्यात किती घसरण झाली?

तज्ज्ञांच्या मते, परदेशी निधीचा प्रवाह आणि एचडीएफसी बँकेच्या शेअरची विक्री यामुळे गुंतवणूकदारांवर परिणाम झाला. निफ्टी 50 या आठवड्यात 2.6 टक्क्यांनी घसरला आहे.

सेन्सेक्समध्ये 2.7 टक्क्यांची घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात बीएसई मिडकॅप निर्देशांक 1.7 टक्क्यांनी घसरला आणि स्मॉलकॅप निर्देशांक 2 टक्क्यांनी घसरला.

HDFC
Economic Review Report: अर्थ मंत्रालयाने आर्थिक परिक्षण अहवाल केला प्रसिद्ध; देशाच्या आर्थिक प्रगतीचा वेग...

गेल्या तीन आठवड्यांपासून बाजारातील वाढीला ब्रेक लागला, गेल्या ट्रेडिंग आठवड्यात निफ्टी मिडकॅप 100 मध्ये सुमारे दोन टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. PSU बँक निर्देशांक वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांकात घसरण झाली.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com