MVI IPO Listing: पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार झाले मालामाल! कंपनीचा IPO 90 टक्के प्रीमियमवर झाला लिस्ट

Meson Valves India IPO Listing: कंपनीच्या शेअर्सची जबरदस्त लिस्टिंग झाली आहे.
Meson Valves share list Today
Meson Valves share list TodaySakal

Meson Valves India IPO Listing: Mason Valves India चा IPO आज 21 सप्टेंबर रोजी शेअर बाजारात लिस्ट झाला. कंपनीच्या शेअर्सची जबरदस्त लिस्टिंग झाली आहे. हे शेअर्स बीएसईवर 193.80 रुपयांवर लिस्ट झाले. Meson Valves चे शेअर्स BSE SME वर 90% च्या भरघोस प्रीमियमसह 193.80 रुपयांवर लिस्ट झाले, ज्याची इश्यू किंमत 102 रुपये प्रति शेअर होती.

पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांनी प्रचंड नफा कमावला आहे. मेसन वाल्व्‍स इंडियाचा IPO 8 सप्टेंबरला सबस्क्रिप्शनसाठी लाँच झाला होता. IPO च्या माध्यमातून 31.09 कोटी रुपये उभारण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

या इश्यूमध्ये किमान 1,200 इक्विटी शेअर्ससाठी बोली लावण्यात आली होती. म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदार 1,22,400 रुपयांच्या केवळ 1,200 शेअर्ससाठी अर्ज करू शकतात कारण त्यांना IPO मध्ये 2 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्याची परवानगी आहे.

मोठ्या नेटवर्थ असलेल्या व्यक्तींची किमान गुंतवणूक रु 2,44,800 (2,400 शेअर्स) असेल. पुणेस्थित व्हॉल्व्ह पुरवठादार IPA कडून उभारलेला निधी 11.37 कोटी रुपयांच्या प्लॉट आणि मशिनरी खरेदीसाठी आणि 11.95 कोटी रुपयांचा निधी खेळत्या भांडवलासाठी वापरला जाईल. उर्वरित निधी सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरला जाईल.

Meson Valves share list Today
Akasa Air: बुडणाऱ्या 'आकासा'ला मोठा आधार! सरकारने घेतला मोठा निर्णय, आता होणार...

कंपनीची स्थापना 2016 मध्ये झाली. मेसन वाल्व्हस इंडिया लिमिटेड कंपनी पूर्वी सँडर मेसन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओळखली जात होती. कंपनी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उद्योगांना स्ट्रेनर्स आणि रिमोट-कंट्रोल व्हॉल्व्ह सिस्टम पुरवते.

मेसन व्हॉल्व्ह इंडिया व्हॉल्व्ह, ऍक्च्युएटर, रिमोट कंट्रोल सिस्टीम, कंट्रोल कॅबिनेट, टँक, व्हिज्युअलायझेशन सिस्टम, पाइपिंग, पंप, फिटिंग्ज यांसारखी उत्पादने असेंबलिंग, खरेदी, विक्री, वितरण, आयात आणि निर्यात करते.

Meson Valves share list Today
Naveen Jindal: नवीन जिंदाल आफ्रिकेत उभारणार स्टील आणि पॉवर प्लांट? काय आहे कंपनीचा प्लॅन

कंपनीचे उत्पादन युनिट भांबोली, खेड, पुणे, महाराष्ट्र येथे आहे. डेन्मार्क, जर्मनी, पोलंड, दक्षिण कोरिया, नेदरलँड्स, स्वीडन, तुर्की आणि यूएई सारख्या देशांतून आणि गोवा, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, दादरा आणि नगर हवेली, दिल्ली या राज्यांमधून देशांतर्गत बाजारपेठेत कंपनी आयात- निर्यात करते.

EMS IPO Listing: 33% प्रीमियमवर एंट्री केल्यानंतर शेअर्समध्ये आणखी वाढ

पाणी आणि सांडपाणी सेवा पुरविणाऱ्या ईएमएसच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि त्यानुसार त्याची मार्केट एंट्रीही यशस्वी झाली. त्याचे शेअर्स 211 रुपये किंमतीला जारी करण्यात आले होते.

आज, कमकुवत बाजारातही, तो बीएसईवर रु. 281.55 च्या किंमतीसह दाखल झाला, याचा अर्थ IPO गुंतवणूकदारांना 33 टक्क्यांहून अधिक लिस्टिंग गेन (ईएमएस लिस्टिंग गेन) मिळाला. लिस्टिंग झाल्यानंतरही शेअर्सची वाढ थांबलेली नाही. सध्या त्याची किंमत रु. 285.50 (ईएमएस शेअर किंमत) आहे म्हणजे IPO गुंतवणूकदार 35 टक्क्यांहून अधिक नफा कमावत आहेत.

2012 मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीचे नाव पूर्वी EMS Infracon होते. हे वॉटर प्लांट, सांडपाणी प्रक्रिया इत्यादीशी संबंधित सेवा देते. गेल्या तीन आर्थिक वर्षांत कंपनीची आर्थिक चांगली आहे.

Meson Valves share list Today
Mark Zuckerberg : 'व्हॉट्सअ‍ॅप बिझनेस' यूजर्ससाठी खुशखबर! नवीन फीचर्सची घोषणा; व्यापारात होणार फायदा

आर्थिक वर्ष 2021 मध्ये, त्याचा निव्वळ नफा 71.91 कोटी रुपये होता, जो पुढील आर्थिक वर्ष 2022 मध्ये 78.93 कोटी रुपये आणि नंतर आर्थिक वर्ष 2023 मध्ये 108.67 कोटी रुपये झाला. मात्र, कंपनीच्या कर्जात कमालीची वाढ झाली आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com