Hindustan Copper Share : हिंदुस्थान कॉपरच्या शेअर्समध्ये तेजी, एका वर्षाच्या उच्चांकावर शेअर...

हिंदुस्थान कॉपरच्या (Hindustan Copper) शेअर्समध्ये सध्या चांगली तेजी पाहायला मिळत आहे. नुकतीच 22 एप्रिलला या शेअर्समध्ये 7 टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली आणि शेअरने 394 रुपयांच्या 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला.
Hindustan Copper share
Hindustan Copper sharesakal

हिंदुस्थान कॉपरच्या (Hindustan Copper) शेअर्समध्ये सध्या चांगली तेजी पाहायला मिळत आहे. नुकतीच 22 एप्रिलला या शेअर्समध्ये 7 टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली आणि शेअरने 394 रुपयांच्या 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ अशा वेळी झाली आहे जेव्हा तांब्याच्या (Copper) किमती 10,000 डॉलर प्रति टनच्या जवळ पोहोचल्या होत्या.

जागतिक अर्थव्यवस्थेतील सुधारणांमुळे आगामी काळात तांब्याची मागणी वाढू शकते, असा बाजारातील तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे तांबे या धातूच्या किमती वाढत आहेत. अमेरिका आणि चीनमध्ये उत्पादन क्रियाकलाप वाढल्याच्या लक्षणांमुळे अलीकडेच धातूंच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत. अमेरिका आणि चीन या जगातील 2 सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था आहेत.

शांघाय एक्सचेंजमध्ये 22 एप्रिलला तांब्याच्या किमती 9,950 डॉलर प्रति टनपर्यंत पोहोचल्या. तांब्याच्या किमती वाढण्याचे एक कारण म्हणजे कच्च्या मालाच्या कमतरतेमुळे त्याचे उत्पादन घटले आहे. याशिवाय ग्रीन एनर्जीवर सरकारच्या वाढत्या फोकसमुळे त्याच्या मागणीचा दृष्टीकोनही सुधारला आहे.

या वर्षाच्या सुरुवातीपासून तांबे, सोने आणि इतर धातूंच्या भावात वाढ झाली आहे. चिनी रिसर्च फर्म अँटाइकेच्या म्हणण्यानुसार या धातूंच्या किमती आणखी वाढू शकतात. जागतिक स्तरावर अनिश्चित आर्थिक परिस्थिती असताना, चीनमध्ये मागणी वाढल्याने धातू मजबूत होऊ शकतात. अमेरिकन रिसर्च फर्म जेफरीजने मार्चमध्ये सांगितले होते की, तांब्याचा दृष्टीकोन (Copper Outlook) अपेक्षेपेक्षा वेगाने सुधारत आहे. बाजारातील तांब्याची मागणी काही काळ त्याच्या पुरवठ्यापेक्षा जास्त असेल असा अंदाज त्याच्या विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. अशा स्थितीत तांब्याच्या दरात चांगली वाढ अपेक्षित आहे.

Hindustan Copper share
IPO Open : वार्या क्रिएशनच्या आयपीओमध्ये करा 25 एप्रिलपर्यंत गुंतवणूक, अधिक जाणून घेऊयात...

नुकताच हिंदुस्थान कॉपरचा शेअर एनएसईवर 4.56 टक्क्यांनी वाढून 380.70 रुपयांवर बंद झाला. 2024 मध्ये आतापर्यंत हिंदुस्थान कॉपरच्या शेअरची किंमत 40.22 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या एका वर्षात या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 283.38 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com