Systematic Investment Plan : दर महिन्याला 5 हजारांची एसआयपी केल्यास 21 वर्षात किती फंड जमा होईल

आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता प्रत्येक पालकाला असते. त्यांचे शिक्षण, लग्न यावर होणाऱ्या खर्चाच्या चिंतेपासून तुम्ही मुक्त होऊ शकता, जर तुम्ही आज आणि आतापासून गुंतवणूक सुरु केली
Systematic Investment Plan
Systematic Investment Plansakal

आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता प्रत्येक पालकाला असते. त्यांचे शिक्षण, लग्न यावर होणाऱ्या खर्चाच्या चिंतेपासून तुम्ही मुक्त होऊ शकता, जर तुम्ही आज आणि आतापासून गुंतवणूक सुरु केली .तर आज आम्ही तुम्हाला अशी एक स्कीम सांगणार आहोत त्यात तुमचे मूल 21 वर्षांचे होईपर्यंत तुम्ही 57 लाख जोडू शकता. या रकमेतून तुम्ही तुमच्या मुलाचे उच्च शिक्षण सहज करून घेऊ शकता आणि त्याच्या लग्नाचा खर्चही पूर्ण करू शकता.

जर तुम्हाला तुमच्या मुलासाठी पैसे वाचवायचे असतील तर त्याचा जन्म होताच एसआयपी सुरू करा. यासाठी तुम्हाला किमान 5000 रुपयांची एसआयपी सुरू करावी लागेल. ही एसआयपी किमान 21 वर्ष सतत चालू ठेवावी लागेल. एसआयपीमध्ये सरासरी परतावा 12 टक्के मानला जातो. कधीकधी परतावा यापेक्षाही जास्त असतो. लाँग टर्म एसआयपीमुळे वेगाने वेल्थ क्रिएशन होते.

तुम्ही 21 वर्षांपर्यंत मुलाच्या नावावर 5000 रुपयांची एसआयपी सुरु ठेवली तर तुम्ही एकूण 12,60,000 रुपये गुंतवाल, पण 21 वर्षांत 12 टक्के दराने तुम्हाला 44,33,371 रुपये व्याज म्हणून मिळतील. ही गुंतवणूक. अशाप्रकारे, 21 वर्षांनंतर तुम्हाला एकूण 56,93,371 रुपये म्हणजेच सुमारे 57 लाख रुपये मिळतील. जर तुम्हाला या योजनेवर 15 टक्के परतावा मिळत असेल, तर 21 वर्षांत 12,60,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला 15 टक्के दराने 76,03,364 रुपये व्याज मिळेल. म्हणजेच तुम्हाला सुमारे 88 लाख मिळू शकतील.

Systematic Investment Plan
SIP in Mutual Funds : ‘एसआयपी’ करण्यात महिलांची आघाडी! पुरुषांपेक्षा महिला करतात अधिक गुंतवणूक; सुरुवातही लवकर

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com