ICICI Prudential AMC stock market
Sakal
ICICI Prudential AMC Share : ICICI Prudential AMC चे शेअर्स सेन्सेक्स आणि निफ्टीवर जवळपास 20 टक्के प्रीमियमसह लिस्ट झाले. यामुळे गुंतवणूकदारांना लिस्टिंग होताच एका शेअरमागे तब्बल ₹441 पर्यंतचा नफा मिळाला आहे. शेअरने बाजारात मजबूत सुरुवात केली असून, त्यानंतरही तेजी कायम ठेवली आहे. त्यामुळे बाजारातील या शेअरकडे गुंतवणूकदार आकर्षित होत आहे.