Bonus Shares : एका वर्षात 951% रिटर्न, आता स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर्सची घोषणा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bonus Shares

Bonus Shares : एका वर्षात 951% रिटर्न, आता स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर्सची घोषणा...

Bonus Shares : शेअर बाजारात मल्टीबॅगर स्टॉक्सने गुंतवणुकदारांना गर्भश्रीमंत केले आहे. कारण अशा शेअर्समध्ये गुंतवणूक करून तुम्ही अतिशय कमी कालावधीत चांगला नफा मिळू शकतो. आयएफएल एन्टरप्रायझेस (IFL Enterprises) हा असाच एक स्टॉक आहे, ज्याने आपल्या गुंतवणुकदारांना दमदार नफा मिळवून दिला आहे.

गेल्या एका वर्षाचा विचार केल्यास त्यांनी गुंतवणूकदारांना 951% इतका चांगला परतावा दिला आहे. आता कंपनीच्या संचालक मंडळाने शेअर्सचे विभाजन करून बोनस जारी करण्याची घोषणा केली आहे.

कंपनी आपले शेअर्स 1:10 च्या प्रमाणात विभाजित करेल. याचा अर्थ कंपनीचा प्रत्येक शेअर 10 लहान शेअर्समध्ये विभागला जाईल. याशिवाय, कंपनीने 1:4 च्या प्रमाणात बोनस शेअर जारी करण्याची घोषणा केली आहे. या अंतर्गत प्रत्येक चार शेअर्समागे एक अतिरिक्त इक्विटी शेअर दिला जाईल.

आयएफएल एंटरप्रायझेसच्या शेअर्सने गेल्या एका वर्षात त्यांच्या गुंतवणूकदारांना तब्बल 951 टक्के परतावा दिला आहे. गेल्या 6 महिन्यांत त्याचे शेअर्स 106 टक्क्यांनी वाढले आहेत. दुसरीकडे, गेल्या 5 वर्षांत त्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना 2,873 टक्के इतका जबरदस्त नफा मिळवून दिला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.